गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

का धुमाकूळ घातला शांताबाई गाण्याने!

ढोल आणि ताशेव्यतिरिक्त एका गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातही धमाल केली ते हेच गाणं शांताबाई.... शांताबाई... या गाण्याने अनेकांना वेड लावलं. हल्लीच्या युवांना डांस करण्यासाठी हे गाणं तर हवचं हवं. याच्या बीट्स आणि लिरिक्सने लोकांना वेड लावले. लोकसंगीताच बाज आणि मराठी रॅपचा स्वरूप असलेल्या या गाण्याने धुमाकूळ घातला.
 
या गाण्यामुळे संजय लोंढे रातोरात स्टार बनले. परंतू कोणालाही कल्पना नसेल हे गाणं वीस वर्षापूर्वी 8X10 च्या खोलीत रचलेले आहे. संजय लोंढे पुण्याच्या नानापेठ राजेवाडीत भाड्याच्या झोपडीत राहत होते. हे गाणं इतकं प्रसिद्ध होईल याची कल्पनाही नसलेले लोंढे यांनी सांगितले की ते त्यांच्या मुलगी प्राजक्तासाठी हे गाणं गुणगुणत असतं. त्यामुळे हे गाणं अस्तित्वात आलं. गणेशोत्सवाच्या तीन महिनेपूर्वी त्यांनी या गाण्याला आवाज दिला आणि ते इतंक गाजलं की कोणीही याची कल्पना केली नव्हती.
या झोपडीत संजयची पत्नी, दोन मुली, मुलगा आणि अपंग आई जिवण्यापण करतात. आपल्या भावाच्या उपचारासाठी त्यांनी हे गाणं एका कॅसेट कंपनीसाठी गायलं. यापूर्वीही संजयने अनेक गाणी लिहिली आहेत. आठवी पास संजय यांना लहानपणापासून गाण्याची आवड असल्यामुळे त्यांनी मराठी रॅप आणि खंडोबाची गाणीही लिहिली आहेत. यापूर्वी त्यांचे गाजलेलं देव धनगर वाड्यात घुसला यावर अनेकांनी ठेके लावले आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या गाण्यांना प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, वैशाली सामंत, सुदेश भोसले या गायकांचाही आवाज लाभला आहे.
 
इतकी प्रसिद्धी मिळाल्यावरही संजय यांना वाटतं की अपेक्षाकृत यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करण्याची गरज आहे आणि त्यांची यासाठी तयारी आहे.

पुढे वाचा शांताबाई गाण्याचे लिरिक्स

शांताबाई गाण्याचे लिरिक्स
 
 
शांताबाई,शांताबाई,शांताबाई शांताबाई
 
रूपाची खान, दिसती छान, लाखात छान, नजरेचा बाण,
तिरकमाण मारीती चकरा तुझा ग नखरा,
इकडुन तिकडं मारीती चकरा,
चकरा-नखरा, चकरा-नखरा,चकरा-नखरा
चकरा-नखरा, चकरा-नखरा,चकरा-नखरा
 
शांताबाई,शांताबाई, शांताबाईआग शांताबाई
 
तेरा ये जलवा,
माहीमचा हलवा,
जिवाचा कालवा,
मनाला भूलवा,
मामाला बाेलवा,
कालवा-हलवा, कालवा-हलवा, कालवा-हलवा
कालवा-हलवा, कालवा-हलवा, कालवा-हलवा
 
शांताबाई, शांताबाई, शांताबाई आग शांताबाई
 
अटक मटक चवळी चटक,
लटक मटक वा-यानं उडती केस झटक,
लटक-मटक,लटक-मटक,लटक-मटक
लटक-मटक,लटक-मटक,लटक-मटक
लटक-मटक,लटक-मटक,लटक-मटक
 
शांताबाई, शांताबाई, शांताबाई आग शांताबाई
 
खटापटा हीचा नटापटा,
आहो पटापटा कसा झटापटा,
जीव लटापटा आहो लटापटा,
हीचा नटापटा बघा पटापटा,
कसा-नटापटा, कसा लटापटा,कसा-नटापटा, कसा लटापटा
कसा-नटापटा, कसा लटापटा,कसा-नटापटा, कसा लटापटा
 
शांताबाई, शांताबाई, शांताबाई आग शांताबाई
 
गिरकी घेतीया गरा गरा,
पदर उडतोय भरा भरा,
हिरोनी दिसती जरा जरा,
तरर रारी रराररा,
 
शांताबाई, शांताबाई, शांताबाई आग शांताबाई
 
पुढे वाचा ShantaBai Lyrics in English

ShantaBai Lyrics in English
 
Shantabai, Shantabai, Shantabai
 
Rupachi khaan, disati chhan..
lakhat chhan, najarecha baan,
Tirkamaan, Mariti chakra tujha g nakhara,
ikdun tikad mariti chakra,
Chakra-Nakhra,
Chakra-Nakhra
Chakra-Nakhra
Chakra-Nakhra, Chakra-Nakhra, Chakra-Nakhra
 
Shantabai, Shantabai, Shantabai, Aga Shantabai
 
Tera ye jalwa, mahimcha halwa..
jivacha kalwa, manala bhulwa..
mamala bolawa,
Kalwa-halwa, Kalwa-halwa, Kalwa-halwa,
Shantabai
Shantabai
Shantabai
Aga Shantabai
 
Atak Matak chavali chatak,
latak matak varyan udati kes jhatak,
latak-matak, latak-matak, latak-matak
Shantabai Shantabai Shantabai
 
khatapata hicha natapata,
aho patapata, kasa jhatapata,
jeev latapata aahe latapata,
hicha natapata bagha patapata
kasa natapata, kasa latapata,
kasa natapata, kasa latapata,
 
Shantabai, Shantabai, Shantabai, Aga Shantabai
 
Giraki ghetiya gara gara,
padar udtoy bhara bhara
hironi disati jara jara
tarr rari rararara
 
Shantabai, Shantabai, Shantabai, Aga Shantabai