Widgets Magazine

तानाजी गलगुंडे हिंदी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला

tanaji galgunde
सिनेमातील आपल्या विनोदी भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळणारा अभिनेता तानाजी गलगुंडे लवकरच हिंदी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कृष्णा अभिषेक आणि सुदेश लेहरी यांच्यासोबत ‘द ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शोमध्ये तानाजी प्रेक्षकांना दिसणार आहे. या कार्यक्रमात तानाजी आकर्षण असल्याची चर्चा सध्या स्मॉल स्क्रीनवर रंगली आहे.
या शोमध्ये अभिनेता तानाजी गलगुंडेसोबत ‘बहू हमारी रजनीकांत’ फेम रिधीमा पंडितही दिसणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुमोना आणि रोशेल राव यांच्या ज्या पद्धतीने व्यक्तिरेखा आहेत तशाच पद्धतीने रिधीमालाही दाखवले जाईल असं बोललं जातं आहे. ‘द कपिल शर्मा शो’ प्रमाणेच हा कॉमेडी शो असेल. अभिनेते मिथुन चक्रवर्तीसुद्धा या शोमध्ये दिसणार आहेत. द कपिल शर्मा शोमध्ये ज्याप्रमाणे सिद्ध यांची भूमिका आहे तशीच मिथुन चक्रवर्ती यांची असणार आहे.


यावर अधिक वाचा :