testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'माझ्या बायकोचा प्रियकर' सिनेमाच्या संगीत व ट्रेलरचे अनावरण

marathi cinema
Last Modified बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (15:54 IST)
राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईमधील 'द व्हियू' अंधेरी येथे पार पडला. यावेळी दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा, रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा, व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, भाग्यश्री मोटे, भारत गणेशपुरे, प्रिया गमरे, मीरा जोशी यांच्यासह सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. नुकतेच लग्न झालेल्या दाम्पत्याची लग्नानंतरची गोष्ट आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. हॉरर कॉमेडी अशा जॉनरचा हा सिनेमा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अनिकेत विश्वासराव व प्रियदर्शन जाधव या दोघांची प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.
marathi cinema
अनेक हिंदी व मराठी सिनेमांचे दिग्दर्शन करणारे राजीव एस. रुईया यांनी सिनेमाची कथा लिहिली असून दिग्दर्शनही केले आहे. या सिनेमाच्या ट्रेलरसोबत सिनेमातील गाणीही यावेळी प्रदर्शित करण्यात आली आहेत. या सिनेमात एकूण चार गाणी आहेत. स्वाती शर्मा व नकाश अझीझ यांच्या आवाजातील 'तू हाथ नको लावूस' या पहिल्या गाण्याला सोशल मीडियावर ४ लाख व्हियूज आहेत. या गाण्याला राजू सरदार यांचे संगीत लाभले आहे. 'मी तुझीच साजणा' हे सिनेमातील दुसरे गाणे असून ते अनिकेत व भाग्यश्री व चित्रित करण्यात आले आहे. स्वाती शर्मा यांनी हे गाणे गायले आहे. तर 'जवळ ये ना' हे अनिकेत व भाग्यश्रीवर चित्रित करण्यात आलेले तिसरे रोमँटिक गाणे आहे. या गाण्याला स्वाती शर्मा व सुशांत दिवगीकर स्वरबद्ध केले आहे. या दोन्ही गाण्यांचे बोल अभय इनामदार यांनी लिहिले असून त्या गीतांना विवेक किर यांनी संगीतबद्ध केले आहे.'गंगे' हे सिनेमातील चौथे गाणे असून त्याचे बोल सुरेश पिल्लई यांनी लिहिले असून त्यांनीच स्वरबद्ध केले आहे. या गीताला प्रभाकर नलावडे यांनी संगीत दिले आहे. प्रियदर्शन व अनिकेतसोबत भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, भारत गणेशपुरे, स्वाती पानसरे, अंशुमन विचारे, पदम सिंह, अनुपम ताकमोघे, सुरेश पिल्लई यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची पटकथा अभिजित गाडगीळ तर संवाद संदीप दंडवते यांनी लिहिली आहे. दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत. येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचे पेन मुव्हीज हे प्रस्तुतकर्ता आहेत.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

बारामती आणि फलटण तालुक्यात दबंग-3 चित्रपटाचं शूटिंग सुरु

national news
बारामती आणि फलटण तालुक्यात सध्या अभिनेता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या दबंग-3 ...

पुणेकरांनी गाडी पार्क का केली नाही...

national news
पोलिसांनी बोर्ड लावला..... "NO PARKING ZONE" Penalty --- Rs 250/-

अनुष्काने विराटशी लग्न केल्याचा केला खुलासा

national news
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या जोडीचे ...

स्मशानभूमीच्या कुंपणाकरीता वर्गणी द्या...

national news
पुण्यनगरीतील एक रोमांचकारी संवाद .. वर्गणीवाले : काका, स्मशानभूमीच्या कुंपणाकरीता ...

टायगर आणि हृतिक या दोघांची जबरदस्त जोडी असणारा “वॉर’चे टिझर ...

national news
हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे दोघेही लवकरच “वॉर’या ऍक्‍शनपटात दिसणार आहेत. गेल्या कित्येक ...