शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

विक्रम गोखलेंनी खोपासाठी केलं सलग 15 तास काम

काही कलाकारांनी आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळेच त्यांनी साकारलेली कोणतीही भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होते. रंगभूमीपासून मालिकांपर्यंत आणि मराठी चित्रपटांपासून हिंदी चित्रपटांपर्यंत सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडण्यात यशस्वी झालेल्या ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही वेळोवेळी साकारलेल्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळेच विक्रम गोखले यांची भूमिका असलेल्या चित्रपटाबाबत सर्वांच्याच मनात कुतूहल असते. 
“खोपा’ या आगामी मराठी चित्रपटात विक्रम गोखले यांनी सलग 15 तास काम करत आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. विक्रम गोखलेंसारख्या कलाकारांना जेव्हा एखाद्या चित्रपटाची कथा आणि त्यातील त्यांची व्यक्तिरेखा आवडते तेव्हा ते स्वतःला झोकून देऊन काम करतात. महागणपती फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या “खोपा’ या आगामी मराठी चित्रपटासाठीही गोखले यांनी अशाच प्रकारे मेहनत घेतली आहे. मानवी नात्यांची कथा सांगणाऱ्या निर्माते जालिंदर भुजबळ यांची निर्मिती तसेच अर्जुन भुजबळ यांची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. सुधीर निकम यांनी केले आहे. नातेसंबंध हा मानवीजीवनाचा गाभा असून “खोपा’ या चित्रपटाची कथा याच नात्यांच्या धाग्यांनी विणलेली आहे.