शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 21 जुलै 2015 (11:38 IST)

अधिक सुखासाठी "हायवे" वरील प्रवास लांबणीवर! (पहा ट्रेलर)

२४ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'हायवे' या चित्रपटाfचे प्रदर्शन काही महत्वाच्या तांत्रिक कामकाजामुळे तात्पुरते लांबणीवर टाकण्यात आले असून लवकरच पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे निर्माते विनय गानू, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी व लेखक अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी जाहीर केले आहे. पुढील महिन्यातील तारखेचा विचार सुरु असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. लेखक गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची देऊळ या राष्ट्रीय सुवर्ण  कमळ विजेत्या चित्रपटानंतरची महत्वाकांक्षी कलाकृती असून मराठीतील ही पहिली रोड मुव्ही आहे.