अभिनेते शेखर नवरे यांचे निधन
अभिनेते शेखर नवरे (५८) यांचे निधन झाले. मधुमेहाच्या आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल होते. राजा इडिपस या नाटकातून त्यांनी अभिनयाच्या प्रांतात पाऊल टाकले. शो मस्ट गो ऑन हे तत्त्व शेखर नवरे यांनी अंगीकारले होते. मध्यंतरीचा काही काळ विश्रांती घेऊन त्यांनी रंगभूमीवर पुन्हा पाऊल टाकले होते. माझं काय चुकलं, मार्ग सुखाचा, तू फक्त हो म्हण, एक होता शहाणा, आंदोलन या नाटकांतल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या होत्या.