गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 16 डिसेंबर 2015 (15:04 IST)

उपासना सिंहचे पहिले मराठी चित्रपट फॅमिली ४२०

उपासना सिंहचे पंजाबी चित्रपट 22जी तुस्सी घॅन्ट हो ने बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन केले आहे. उपासना सिंहचे म्हणणे आहे की मी मागील काही महिन्यांपासून मुंबईत राहत आहे आणि मनापासून माझी इच्छा होती की मी मराठी चित्रपटात काम केले पाहिजे, पण उत्तम स्क्रिप्ट मिळत नव्हती आणि वेळ नसल्यामुळे हे शक्य नव्हत. पण फॅमिली ४२०ची कथा ऐकल्यानंतर निर्माता देवराज आणि संतोष गायकवाड यांना नकार न देता तिने चित्रपटासाठी आपली सहमती दिली. मराठी भाषेबद्दल एका  प्रश्नाचे उत्तर देताना उपासना सिंहने म्हटले की अभिनय करणार्‍या कलाकारांची लोक कलाकारी बघतात आणि आता एवढ्या वर्षांपासून मुंबईत राहत असताना मला मराठी संवाद साधने आले आहे.  
 
लावण्य प्रॉडक्शन आणि क्रिएशन्सच्या बॅनर खाली निर्माता देवराजचे चित्रपट फॅमिली ४२०चे भव्य मुहूर्त मुंबईच्या अंधेरी स्थित ओबी स्टुडिओत पार पडले. ज्यात बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता निर्देशक राकेश रोशन व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर प्रमुख होते. चित्रपट फॅमिली ४२०चे दिग्दर्शक संतोष गायकवाड आहे. चित्रपटाचे गीत अवधूत गुप्ते यांनी लिहिले आहे आणि संगीत दिले आहे सुशील पेंढारी यांनी व हे गाणे गायले आहेत सुदेश भोसले, बेला शेंडे आणि वैशाली माडे यांनी. चित्रपटात उपासना सिंहसोबत  विजय पाटकर, सुनील पाल, विजय कदम, सुकन्या कुलकर्णी आणि भूषण कुडू यांच्या मुख्य भूमिका आहेत. याची माहिती उपासनाने  निजी जन संपर्क अधिकारी संजय भूषण पटीयाला यांना मुंबईत दिली.