शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मे 2015 (17:52 IST)

गणेश यादव एका वेगळ्या भूमिकेत….

'इस रात कि सुबह नहीं' या सिनेमापासून आपल्या करिअरला खऱ्या अर्थाने गणेश यादव यांनी सुरूवात केली.  गणेश यादव नाव घेतलं की समोर उभी राहते ती फ़्रक्चर बंड्याची व्यक्तीरेखा…. त्यांच्या 'शूल' या सिनेमातल्या त्यांच्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेमुळे त्यांना पुढे ही तशाच भूमिका मिळत गेल्या. गणेश यांनी आतापर्यंत नेगेटिव्ह शेड्स असलेल्या भूमिका केल्या. मात्र सिद्धांतमधील त्यांची भूमिका साधी आहे. गणिततज्ञाचा मुलगा असला तरीही गणितातील व्यवहारापेक्षा  नात्यामधील गणित अधिक सांभाळणारा मुलाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या या भूमिकेचंही प्रेक्षक कौतुक करतील यात शंका नाही.