शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

तेजश्री आता हिंदी नाटकात

‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेत भूमिका करत असतानाच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला ‘कार्टी काळजात घुसली’ या मराठी नाटकासाठी विचारणा झाली. या नाटकात काम केल्यानंतर तिच्या कामाचं बरंच कौतुक झालं. 
 
आता मराठी नंतर तेजश्री हिंदी नाटकातही दिसणार आहे. शरमन जोशी निर्मितत ‘मैं और तू’ या नाटकात तेजश्री शरमन सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 
 
या बरोबरच तेजश्री एका मराठी सिनेमाचंही शूटिंगही करते आहे. त्यामुळे नाटक, सिनेमा या दोन्ही गोष्टी हॅण्डल करता करता तेजश्रीची चांगलीच दमछाक होत आहे.