शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2015 (11:13 IST)

नाना दुष्काळात शेतकर्‍यांना वाटणार 80 लाख रुपये

अभिनेता नाना पाटेकर राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात देऊ केला आहे. त्याच्या मदतीला मराठमोळा अभिनेता मकरंद अनासपुरेही होता. या दोघांनी पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी 15 हजारांची मदत दिली. आता त्यापुढे एक पाऊल टाकत नाना पाटेकर फाउंडेशनने 80 लाख रुपयांचा निधी गोळा केलाय. 
 
पाटेकर यांने दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकर्‍याला बाहेर काढण्यासाठी तसेच त्याला धीर देण्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुमच्या मनात जरी आत्महत्येचा विचार आला, तरी तुम्ही मला एक फोन करा, असे भावनात्मक आवाहन नानाने केले आहे. आम्ही आमच्या परीने प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. लोक मदत करीत आहेत. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालाय. जे 80 लाख रुपये जमा झाले आहेत. ते पैसे गणपती विसर्जन झाल्यानंतर खान्देश आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना देण्यात येतील, असे नानाने म्हटले.