गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 डिसेंबर 2015 (11:09 IST)

मँगो डॉलीला पाहून प्रेक्षक म्हणतील वाह ‘गुरू’

गोड निरागस, सालस, देखणी अभिनेत्री अशी विशेषणं ऐकली की ऊर्मिला कानिटकर-कोठारे हिचं नाव चटकन तोंडी आलशिवा राहात नाही. दुनिादारी सिनेमात साकारलेली मिनू काहीशी तशीच होती. मात्र प्यारवाली लव्ह स्टोरीने तिच्या चाहतंना जोरदार झटकाच दिला. तुफान, टॉमबॉईश नंदिनीने प्रेक्षकांची झोपच उडवली. आता तर ऊर्मिला आपल्याला भन्नाट रुपात दिसणार आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि ड्रीमिंग ट्वेंटी फोर बाय सेव्हनची निर्मिती असलेला ‘गुरू’ सिनेमा 22 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन संजय जाधव करत असून या चित्रपटात ऊर्मिलाचा नुसताच वेगळा रोल नाही तर तिचा हटके मेक ओव्हर सुध्दा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंकुश चौधरीच्या सनग्लासेसच स्टाईलची जशी सगळीकडे चर्चा आहे तशीच ऊर्मिला तिच्या जबरदस्त लूकमुळे रॉकऑन झाली आहे. तिने ‘गुरू’ सिनेमात साकारलेली ‘मँगो डॉली’ तिच्या चाहत्यांनी यापूर्वी नक्कीच पाहिली नसेल. ‘गुरू’ मधील तिचा रावडी लूक तिने आतापर्यंत केलेल्या भूमिकांपैकी चाकोरी बाहेरचा असेल. तिच्या तोंडी असलेले गावरान संवाद, भडक रंगाच्या घागरा-चोळीचा पेहराव आणि तिने वठवलेली भूमिका पाहून वाह ‘गुरू’ म्हणतील.