शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2016 (12:10 IST)

मांजरेकरांच्या ‘ऋण’मध्ये आकाश

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांना सैराटच्या यशानंतर रसिक मायबापांचे भरभरून प्रेम मिळाले. अगदी सामान्य कुटुंबातील या दोघांना आता अगदी बाऊन्सर घेऊन फिरण्याची वेळ आली. हे सारे बदल मराठी सिनेसृष्टीत अगदी पहिल्यांदा होताना दिसत आहेत. रिंकू आणि आकाशची वाढती लोकप्रियता हे त्यांच्या उत्कृष्ट कामाची पोचपावती आहे.
 
रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचे आयुष्यच सैराटनंतर बदलून गेले. सैराटच्या भरभरून यशानंतर रिंकू राजगुरूला जाहिरातींमध्ये काम मिळाले तर आकाश ठोसर चक्क महेश मांजरेकरच्या ऋण म्हणजे Fun Unlimited या चित्रपटात काम करत आहे. सध्या आकाशचे काही  फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 
महेश मांजरेकर दिग्दर्शित ण या चित्रपटात आकाश ठोसर हा सत्या मांजरेकरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहे. सैराटच्या भरघोस यशानंतर आकाशला ही संधी चालून आली. पण या संधीसोबतच त्यांना त्याच्या खासगी आयुष्यात याचा फटका बसत आहे. आता रिंकू आणि आकाशला सामान्यांप्रमाणे फिरता येत नाही. आणि याचा फटका आकाशच्या दुसर्‍या चित्रपटाच्या शूटिंगलादेखील होत आहे.
 
या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या महाराष्ट्राच्या विविध भागात सुरु असून चाहत्यांच्या गर्दीमुळे आकाशला प्रचंड पोलीस बंदोबस्तात राहावे लागत आहे. ‘ऋण’ च्या सेटवर आकाश आहे, याची कुणकुण लागू नये, याचा सर्वतोपरी प्रयत्न चित्रपटाची टीम करत आहे. मात्र आकाश जिथे जातो, तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी, त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची अलोट गर्दी लोटते. त्यामुळे आकाशसोबत शूटिंग करणे अतिशय जिकरीचे बनल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तरूणाईवर आधारित असा महेश मांजरेकर दिग्दर्शक ण हा चित्रपट आहे. या चित्रपटात चार मित्रांची गोष्ट आहे. महेश मांजरेकर सांगतात की चित्रपटाच्या नावातच सर्वकाही आहे.