शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑगस्ट 2014 (12:55 IST)

मानसी मोघे मराठी सिनेमात

एखादी सौंदर्य स्पर्धा जिंकली की कोणतीही सौंर्दवती बॉलिवूडमध्ये धाव घेते. याला मराठी मुलीही अपवाद नाहीत. पण यातूनही मानसी मोघे या मराठमोळ मुलीने वेगळी वाट निवडत बॉलिवूडपेक्षा मराठी चित्रपटाला प्राधान्य दिलं. मिस युनिव्हर्स 2013 मध्ये हिंदुस्थानचे नेतृत्व करत अखेरच्या सातजणींपर्यंत मजल मारणारी मानसी ‘बुगडी माझी सांडली गं’ सिनेमाद्वारे मराठीत पदार्पण करते. ‘वॉन रान्स एन्टरटेनमेंट’ प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती श्याम सिंघानिया करत आहेत. ‘सौंदर्यस्पर्धेत भाग घेतल्यावरच रुपेरी पडद्यावर येण्याचा ठाम निश्चय मी मनाशी केला होता. पण हिंदीपेक्षा आपल्या मायबोली मराठी भाषेतच पहिला चित्रपट करावा असंही मनोमन ठरवलं होतं.’

मानसी भरभरून बोलत होती. ‘त्याचवेळी हा सिनेमा समोर आला. लावण्यांवर बेतलेला असल्याने आणि मानसिंग पवार यांचं दिग्दर्शन असल्याने  ती नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.’ असेही ती म्हणाली. या सिनेमात मानसीसह कश्यक परुळेकर, मोहन जोशी, दीपा चाफेकर, इला भाटे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. प्रवीण कुंवर, बब्रू भोसले व सचिन-दीपेश यांनी संगीत दिलयं.