गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जुलै 2015 (09:39 IST)

लयभारीमुळे मराठीच्या जवळ आलो- रितेश देशमुख

विनोदी चित्रपट करत असताना मला एक व्हिलन या चित्रपटातल्या खलनायकी भूमिकेबद्दल विचारणा झाली. मला त्या भ‍ूमिकेत लोकांनी स्वीकारले, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अनेक हिंदी चित्रपट केल्यावर माझ्याकडे लय भारी हा मराठी चित्रपट आला. या चि‍त्रपटामुळे मी मराठी भाषेच्या अधिक जवळ गेलो असल्याची प्रतिक्रिया अभिनेता रितेश देशमुख याने दिली.

तो पुढे म्हणाला की, लय भारी या चित्रपटामुळे मला मराठीत वेगळी ओळख आणि नावही मिळाले. तुझे मेरी कसम, मस्ती, ग्रॅण्ड मस्ती, हे बेबी, हाउसफुल्ल, एक व्हिलन, क्या कूल है हम, अपना सपना मनी मनी असे अनेक हिंदी चित्रपट मी केले. विविध दिग्दर्शक, विविध कलाकार तसेच तंत्रज्ञानाबरोबर काम केले आणि प्रत्येकांकडून काही तरी शिकत गेलो.