गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (16:00 IST)

शाहरुख करणार पाक अभिनेत्रीसोबत रोमान्स

रोमान्सचा बादशहा अशी ओळख असलेला शाहरुख खान आपल्या आगामी चित्रपटात तेट पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. पाक अभिनेत्री माहिरा कान हिचे नाव शाहरुखची प्रमुख भूमिका असलेल्या 'रईस'या चित्रपटाची मुख्य नायिका म्हणून पक्के झाले आहे. शाहरुखच्या 'रईस'ची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. 2015मधील एक तगडा सिनेमा म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळेच त्याचे स्टार सिलेक्शनही तेवढ्याच बारकाईने केले जात आह. 'रईस'साठी या आधी सोनम कपूर आणि कृती सनोन यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता या दोघींचीही नावे मागे पडलीत आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा हिने एंट्री घेतली आहे.