बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑगस्ट 2014 (16:05 IST)

‘का रे दुरावा’ची एन्ट्री

झी मराठी वाहिनीवरील एका लग्नाची तिसरी गोष्ट ही मालिका प्रेक्षकांची रजा घेणार असून त्याऐवजी आता नवीन मालिका भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. ‘का रे दुरावा’ हे या नवीन मालिकेचे नाव आहे.

संसारात पती-पत्नीला अनेक गोष्टींमध्ये तडजोडी कराव्या लागतात यातील काही तडजोडी स्वेच्छेने केलेल्या असतात तर काही अनिच्छेने. अशा तडजोडीमुळे अनेकदा नात्यामध्ये कटुपणासुद्धा येतो.

पण काही तडजोडी केल्यानंतरही संसारातील गोडवा टिकून राहात असेल आणि दिवसागणीक प्रेम वाढतच असेल तर ती तडजोड पण गोडच वाटते.

अशाच तडजोडीची आणि प्रेमाची कथा आहे ‘का रे दुरावा’ या मालिकेची. फिल्म फार्मची निर्मिती असलेली ही मालिका 18 ऑगस्टपासून दर सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.