गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 24 सप्टेंबर 2015 (10:26 IST)

‘कोर्ट’ने चढली ऑस्करची पायरी

कोर्टाची पायरी कधी चढू नये, असे गंमतीने म्हटले जाते. पण, कोर्ट या मराठी चित्रपटाने थेट  ऑस्करची पायरी चढली आहे. भारताकडून  ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली.
 
यापूर्वी श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटांची निवड झाली होती.  ऑस्कर पुरस्कारासाठी कोर्टच्या रूपाने मराठी चित्रपटाची तिससर्‍यांना अधिकृत निवड झाली आहे़  आॅस्करच्या बेस्ट फॉरेन फिल्म या विभागासाठी ह्यकोर्टह्ण निवडला गेला आहे. या घटनेमुळे मायमराठीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या चित्रपटाचे चैतन्य ताम्हाणे या युवा दिग्दर्शकाने लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. विवेक गोम्बर या युवा निर्मात्याने निर्मिती केली असून, यात महत्त्वाची भूमिकाही साकारली आहे.
 
चळवळीतील कार्यकर्ते वीरा साथीदार यांनी यात प्रमुख भूमिका रंगवली आहे. गीतांजली कुलकर्णी या अभिनेत्रीचीही महत्त्वाची भूमिका या चित्रपटात आहे. शाहीर संभाजी भगत यांनी यासाठी गीते लिहिली असून, त्यांनी चित्रपटाला संगीतही दिले आहे