शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

‘बाजीराव मस्तानी’चा नवा विक्रम

संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’नं बॉक्स ऑफिससवर अनेक रेकॉर्ड केले. या रेकॉर्डमध्ये आता आणखी एक भर पडली आहे. बाजीराव मस्तानी रिलीज होऊन 50 दिवस झालेत आणि आजही थिएटरमध्ये बाजीराव मस्तानीचे शो सुरू आहेत. प्रेक्षकही 50 दिवसांनंतरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देत आहेत.

‘बाजीराव मस्तानी’च्या रिलीजला 50 दिवस झाल्यामुळे चित्रपटात बाजीरावची भूमिका साकारणार्‍या रणवीर सिंगनं ट्विट केलं आहे. 50 दिवसांनंतरही ‘बाजीराव मस्तानी’ जोरात चालला याचा फोटो रणवीरनं ट्विट केला आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिससवर आतापर्यंत 350 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सगळ्यात जास्त कमाई करणार्‍या चित्रपटांपैकी बाजीराव मस्तानी एक आहे. बाजीराव मस्तानीला यंदाच्या फिल्मफेअर अँवॉर्डमध्येही तब्बल 12 नॉमिनेशन्स मिळाली होती, त्यापैकी 9 अँवॉर्ड या चित्रपटाला मिळाली, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी, सर्वोत्कृष्ट अभिनेता-रणवीर आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री-प्रियांका चोप्रा यांचा समावेश होता.