शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 11 मे 2015 (10:43 IST)

‘म्हाळसा’ दिसणार मोठ्या पडद्यावर

मराठी रसिकांच्या मनात घर केलेल्या ‘जय मल्हार’ मालिकेतील म्हाळसा अर्थातच सुरभी हांडे आता मोठ्या पडद्यावरही झळकणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं बाई अरेच्च 2’ या मराठी सिनेमातून सुरभी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याचबरोबर विविध प्रादेशिक भाषांमधील नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडलेले अभिनेता धरम गोहिलही या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहेत.
 
22 मे रोजी हा सिनेमा सर्व थिएटरमध्ये झळकणार आहे. ‘संधी मिळाली तरच माणूस मोठा होऊ शकतो. नवीन कलाकारांसोबत काम करणे जोखमीचे असले तरी त्यांच्यातील ऊर्जा नेहमीच प्रेरणा देत राहते.’ या केदार शिंदे यांच्या वक्तव्याला साजिशी ही निवड असून मोठ्या सोनाली कुलकर्णीच्या कॉलेज जीवनातील भूमिका सुरभी साकारत आहे. 
 
सुरभी मूळची नागपूरची आहे. जळगावाला तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आणि पुढील शिक्षण तिने नागपूरला घेतले. या संपूर्ण शैक्षणिक कालावधीत सुरभी विविध नाटकांमध्येही काम करू लागली. मुळातच नाटकांची आणि अभिनयाची आवड असलेल्या सुरभीने अनेक एकांकिका स्पर्धा, राज्यनाटय़, स्पर्धांमध्ये भाग घेतला. तेथे तिच्या अभिनयाला वाखाणण्यात आले. नागपूरला व्यावसायिक नाटकांमध्येही तिने काम केले.‘