शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 मे 2015 (16:21 IST)

‘युद्ध अस्तित्वाची लढाई’ चित्रपटाचे म्युझिक लाँच

युद्ध या चित्रपटाचा शानदार म्युझिक लाँच समारंभ मुंबईत निर्माते शेखर गिजरे आणि दिग्दर्शक राजीव एस रुईया व कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. बॉलीवूड कलावंत रजनीश दुग्गल यांनी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून या सोहळ्याला हजेरी लावली. त्या प्रसंगी शेखर गिजरे यांनी म्हटले की हा माझ्यासाठी फार महान क्षण आहे जेव्हा सर्व तारे तारकांनी या म्युझिक लाँच समारंभात भाग घेतला.  
 
शेखर गिजरे निर्मित राजीव रुईया दिग्दर्शित ‘युद्ध’ एक अस्तित्वाची लढाई हा सिनेमा बोकाळलेला भ्रष्टाचार, अत्याचार त्यात सर्वसामान्य माणसाची होणारी ससेहोलपट, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा राग यावर भाष्य करतो. 
 
रजनीश दुग्गल म्हणाले की मराठी इंडस्ट्री आता वेगाने पुढे जात आहे आणि मला त्याचा अभिमान वाटतो की मी या इंडस्ट्रीचा एक भाग आहोत. तसेच दिग्दर्शक राजीव एस रुईया या अगोदर हिंदी सिनेमांसाठी दिग्दर्शन करत होते. ते प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीच दाखल झाले आहे. ते म्हणाले मराठी चित्रपट तयार करणे म्हणजे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखेच आहे. 
       
या चित्रपटात एकूण चारगीते असून ती जाफर सागर यांनी लिहिली आहेत.या गीतांना विवेक कार यांचे संगीतलाभले आहे. ‘चल दूर दूर’, ‘देवा सांगना’, ‘देवा गणेशा’, अनप्लग ‘चल दूर दूर’ अशा चार गीतांची मेजवानी या चित्रपटात आहे. या गीतांना आदर्श शिंदे, स्वाती शर्मा, प्रताप, देव नेगी यांच्या स्वराचे कोंदण लाभले आहे.
 
राजेश शृंगारपुरे, तेजस्विनी पंडित, क्रांती रेडकर, पंकज विष्णू, वर्षा उसगांवकर, स्मिता ओक, संजय कुलकर्णी, सोमनाथ तडवलकर, शीतल मंत्री यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.