Widgets Magazine
Widgets Magazine
Widgets Magazine

मितालीचे नाव विसरला आमिर

सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी सध्या आमिर खान आणि जायरा देभर विविध ठिकाणी फिरत आहे. दरम्याने 13 ऑक्टोबर रोजी हे दोघेही भारत- ऑस्ट्रेलिया दरम्यानचा तिसर्‍या टी-20 सामन्यासाठी राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियमला पोहचले होते.
खेळापूर्वी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि जतिन यांच्यासोबत एक खास रॅपिड फायर राउंड रंगला. यामध्ये जायरा आणि आमिरला खेळाशी निगडीत काही प्रश्न विचारले. मात्र भारतीय महिला संघाची कॅप्टन कोण? हा प्रश्न विचारल्यानंतर दोघेही बराच वेळ अनुत्तरित राहिले.
मला उत्तर माहित आहे पण आता ते नाव ओठांवर येत नाही असे उत्तर आमिर खानने दिले. त्यानंतर जतिन यांनी बर्‍याच हिंट दिल्यानंतर आमिरने योग्य उत्तर दिले. मिताली राज ही भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे.


यावर अधिक वाचा :