testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मितालीच्या नावावर एक आणि उपलब्धता, महिला क्रिकेट संघाची कर्णधार

लंडन| Last Modified मंगळवार, 25 जुलै 2017 (11:02 IST)
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला आयसीसी जागतिक महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा मान देण्यात आला आहे. मितालीने नुकत्याच पार पडलेल्या महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपदापर्यंत पोहोचविण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
भारतीय महिला संघाला अंतिम सामन्यात इंग्लंडकडून केवळ 9 धावांनी पराभव पत्करावा लागला. 34 वर्षीय मितालीने या स्पर्धेत 409 धावांची कमाई करताना अफलातून सातत्य दाखविले. उपान्त्यपूर्व लढतीचा दर्जा मिळालेल्या महत्त्वाच्या सामन्यात मितालीने न्यूझीलंडविरुद्ध 109 धावांची खेळी करून भारताला उपान्त्य फेरीत नेले. तिने त्याआधी इंग्लंडविरुद्ध 71, वेस्ट इंडीजविरुद्ध 46, श्रीलंकेविरुद्ध 53 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 69 धावा फटकावल्या.
आयसीसीच्या जागतिक महिला संघात हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा या आणखी दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय विश्‍वविजेत्या इंग्लंड संघातील चार, दक्षिण आफ्रिकेच्या संघातील तीन, आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघातील केवळ एका खेळाडूचा समावेश आहे. इंग्लंडची नताली स्किव्हर बारावी खेळाडू आहे.

आयसीसी महिला संघ- मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर व दीप्ती शर्मा (सर्व भारत), टॅमी ब्यूमॉंट, ऍन्या श्रबसोल, साराह टेलर व अलेक्‍स हार्टली (सर्व इंग्लंड), लॉरा वूल्व्हार्ट, मेरिझेन कॅप व डेन व्हॅन निकर्क (दक्षिण आफ्रिका), एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया), बारावी खेळाडू- नताली स्किव्हर (इंग्लंड).


यावर अधिक वाचा :