बाबर आझमचा कोहलीला मागे टाकून विक्रम

Last Modified गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (15:27 IST)
कराची: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान शतकांचा नवा विक्रम रचला आहे. आझमने 71 सामने खेळून 11 शतके ठोकण्याचा पराक्रम केला आहे. या बाबतीत त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला मागे टाकलं आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बाबर आझमने हा पराक्रम केला आहे. आझमने या सामन्यात 115 धावा फटकावल्या. एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचं अकरावे शतक आहे. अवघ्या 71 डावांमध्ये त्याने हा टप्पा गाठला आहे. विराट कोहलीला 11 शतकांचा टप्पा गाठण्यासाठी 82 डाव खेळावे लागले होते. आझमने ती कामगिरी विराटपेक्षा 11 सामने कमी खेळून केली आहे.

श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 7 बाद 305 धावा केल्या. त्यात आझमच्या 115 धावांचा समावेश होता. अवघ्या 105 चेंडूंत त्याने या धावा केल्या. हा सामना पाकिस्तानने 67 धावांनी जिंकला. पाकिस्तान-श्रीलंकेमधील पहिला एकदिवसीय सामना रद्द झाला होता.
सर्वाधिक वेगवान 11 शतके करण्याचा एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रम दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हाशीम आमला याच्या नावावर आहे. त्याने 64 डावांमध्ये 11 शतके झळकावली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचाच क्विंटन डिकॉक हा फलंदाज आहे. त्याने 65 सामन्यांत ही कामगिरी केली आहे. त्याच्यानंतर आता बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद बाबर आझम हा पाकिस्तानी क्रिकेट संघाचा उपकर्णधार आहे.
19 वर्षांखालील संघामध्ये उत्तम कामगिरीच्या जोरावर त्याने पाकिस्तानी संघात प्रवेश मिळवला होता. सध्या तो पाकिस्तानचा आधारस्तंभ बनला आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे. तो स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली, केन विल्यमसन व ज्यो रूट यांच्या तोडीचा फलंदाज मानला जातो. टी-20 मध्ये या सर्व खेळाडूंपेक्षा त्याची धावांची सरासरी अधिक आहे. तर, एकदिवसीय सामन्यांमध्ये सरासरीच्या बाबतीत तो या चौघांपैकी फक्‍त कोहलीच्या मागे आहे.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आज हैदराबाद-पंजाब भिडणार

प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आज हैदराबाद-पंजाब भिडणार
सलग तीन विजयांनी पुन्हा एकदा विजयीपथावर परतलेल्या पंजाबचा संघ व मागील सामन्यात मोठा विजय ...

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला, दिल्ली रुग्णालयात

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला, दिल्ली रुग्णालयात दाखल
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला. वृत्तानुसार, ...

IPL 2020 RCB vs KKR: मोहम्मद सिराजने आपल्या यशाचे रहस्य ...

IPL 2020 RCB vs KKR: मोहम्मद सिराजने आपल्या यशाचे रहस्य सांगितले, म्हणाला- या फलंदाजाला बाद केल्याने सर्वाधिक आनंद झाला
आयपीएल 2020 च्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 8 ...

IPL 2020 Points Table: पंजाबने दिल्लीला पराभूत केल्यानंतर ...

IPL 2020 Points Table: पंजाबने दिल्लीला पराभूत केल्यानंतर उंच उडी मारली, जाणून घ्या कोणत्या नंबरवर पोहोचली
मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2020) दिल्ली कॅपिटल्सला किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ...

पंजाबला आज दिल्लीचे खडतर आव्हान

पंजाबला आज दिल्लीचे खडतर आव्हान
गतविजेत्या मुंबईविरुध्दच्या रोमांचक विजयाने पंजाबचे मनोबल वाढलेले असेल. मात्र आता ...