Widgets Magazine
Widgets Magazine

सेहवागसह चाहत्यांनी केला स्मृती मंधानाच्या ट्‌विटरवर शुभेच्छांचा वर्षाव

पुणे, बुधवार, 19 जुलै 2017 (12:08 IST)

भारतीय महिला संघाची आक्रमक फलंदाज स्मृती मंधानाचा आज वाढदिवस आहे. मांधनाचा हा 21 वा वाढदिवस असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. स्मृतीचा जन्म 18 जुलै 1996 मध्ये झाला आहे.
 
भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज अशी ओळख असणारा विरेंद्र सेहवाग, महिला संघाची कर्णधार मिताली राज यांच्यासह अनेक चाहत्यांनी मंथनाला ट्‌विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. सेहवाग. मिताली राजसह अनेक क्रिडापटूंनी आणि स्मृतीच्या चाहत्यांनी स्मृतीला वाढदिवसाच्या शुणेच्छा दिल्या आहेत.
 
सेहवागने आपल्या ट्‌विटमध्ये मांधनाही उगवता तारा असल्याचे म्हण्टले आहे. कायम अशीच उगवत रहा अशा शुभेच्छा ही सेहवागने दिला दिल्या आहेत.
 
महिला क्रिकेट विश्‍वचषकामधील झालेल्या दुसऱ्या सामन्यात मंथना हिने शानदार शतक लगावत भारताला वेस्ट इंडिज विरूद्ध विजय मिळवून दिला. या शतकानंतर स्मृतीने एक अनोखा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या सामन्यात स्मृतीने नाबाद 106 धावा केल्या होत्या. स्मृती सर्वात कमी वयात भारताकडून विश्‍वचषकामध्ये शतक लगावणारी पहिली भारतीय ठरली आहे. या सामन्यावेळी स्मृतीचे वय 20 वर्ष आणि 346 दिवस होते. तिने आज 21 वर्ष पुर्ण केले. तसेच विश्‍व क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक लगावण्याच्या यादीत मांधना तिसऱ्या क्रमांकावर आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

क्रिकेट मराठी

news

नागपूर : वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली आहे. नागपुरातील ...

news

मोहम्मद शमीला शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न

भारतीय क्रिकेट संघातील तेज गोलंदाज मोहम्मद शमीला कोलकाता येथे चौघांनी शिवीगाळ आणि ...

news

श्रीलंका दौर्‍यासाठी पांड्याचा नवीन हेअरकट

आपल्या अष्टपैलू खेळासह पांड्या त्याच्या हेअर स्टाईलमुळेही तितकाच प्रसिद्ध झाला आहे. ...

news

आयसीसी क्रमावारीत मिताली दुसऱ्या स्थानी

भारतीय महिला संघाची कर्णधार आणि आक्रमक फलंदाज मिताली राजने सध्या सुरू असलेल्या महिला ...

Widgets Magazine