मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (12:13 IST)

हरभजन सिंहने केली चिमुरडीला मदत

फिरकीपटू हरभजन सिंहने एक ट्वीट पाहिल्यानंतर चार वर्षांच्या मुलीच्या उपचारांसाठी आर्थिक मदत केली आहे.

हरभजनने काही दिवसांपूर्वी खालसा एड नावाच्या ट्विटर हॅण्डलवर चार वर्षांच्या काव्याचा फोटो पाहिला. ही मुलगी दिल्लीतील रुग्णालयात दाखल असून तिला मेंदूचा आजार आहे. या आजाराच्या उपचारांसाठी 4600 डॉलरच्या मदतीची गरज आहे, अशी माहिती या ट्वीटमध्ये दिली होती.

ट्वीट पाहिल्यानंतर हरभजनचं काळीज पिळवटलं आणि ट्वीटला रिप्लाय करुन मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. “मी कशाप्रकारे या मुलीची मदत करु शकतो, मला तिच्या उपचारांसाठी मदत करायची आहे. मला सगळी माहिती उपलब्ध करुन द्या,” असं ट्वीट हरभजनने केलं. 

मिळालेल्या माहितीच्या आधारावर भज्जीने दिल्लीतील रुग्णालयात जाऊन काव्याची भेट घेतली. तसंच तिला आर्थिक मदतही केली. यानंतर हरभजनने ट्वीट केलं की, “काव्या आमची मुलगी आहे. देव तिचं रक्षण करो. आम्ही फक्त आमचं काम करत आहोत.”