शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: हैदराबाद , शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017 (11:22 IST)

हार्दिक पांड्यावर कौतुकाचा वर्षाव!

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेलेन टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे कौतुक केले असून कसोटी क्रिकेटच्या भविष्यातील एक खेळाडू म्हणून त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. 23 वर्षीय पांड्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये पर्दापण केलेले नाही. पण मागील काही दिवसांपासून पांड्या वनडे आणि टी 20 मध्ये आपली भूमिका चोखपणे बजावत आहे. पांड्याबाबत बोलताना कुंबळे म्हणाला की हार्दिकला आम्ही संघात ठेवू इच्छितो कारण की, कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू कामगिरी करण्याची त्याच्यात क्षमता आहे. असे फार कमी पाहायला मिळते की, 140 प्रति किमी वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज तेवढीच चांगली फलंदाजीही करतो.