बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2017 (13:13 IST)

गिब्सचा खुलासा, त्या सामन्याच्या दिवशी 'हैंगओवर'मध्ये होता!

वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे, या लक्षाला यशस्वीपूर्ण मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रीकी फलंदाज हर्शल गिब्सची 175 धावांची जादुई पारी होती. आता नुकतेच गिब्सने या डावाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. गिब्सने सांगितले की त्या सामन्या दरम्यान तो नशेत होता आणि नशेच्या अवस्थेत त्याने तो डाव खेळला होता.  
 
गिब्सने सांगितले की त्या सामन्याअगोदरच्या रात्री त्याने फार दारूचे सेवन केले होते आणि मॅचच्या दिवशी तो हँगओवरमध्ये होता. हे सर्व रहस्य गिब्सने आपल्या ऑटोबायोग्राफीच्या मध्यमाने उघडले आहे. त्याच्या पुस्तकाचे नाव 'टू द पॉइंट : द नो होल्ड्स बार्रेड ऑटोबायोग्राफी' आहे.  
 
महत्त्वाचे म्हणजे 2006मध्ये खेळण्यात आलेल्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाई संघाने 434 धावांचे लक्ष्य उभे केले होते, त्याच्या उत्तरात गिब्सने 111 चेंडूंवर 175 धावांची धुआंधार पारी खेळली होती, त्याच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रीकाने या लक्षाला मिळवले होते.