शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

धोनी कसोटी खेळू शकतो- कैफ

कोलकता- महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजीबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण विजय हजारे करंडकात झारखंडकडून खेळताना छत्तीसगड विरूद्ध शानदार शतक ठोकले. धोनीच्या या शतकाने छत्तीसगडचा कर्णधार मोहम्मद कैफ मात्र बराच खूश झाला आहे.
 
कैफला अजूनही वाटते की धोनी आजही तिनही फॉर्मेटमध्ये खेळू शकतो. झारखंडने छत्तीसगडवर विजय मिळवल्यानंतर छत्तीसगडचा कर्णधार कैफ म्हणाला की धोनीकडे नैसर्गिक गुणवत्ता आहे. जे तुम्हीही आजयर्पंत पाहत आला आहात. माझे मत आहे की वनडे टी-20 आणि कसोटीत आजही धोनी खेळू शकतो. तो आजही प्रत्येक चेंडूवर जोरदार फटका मारू शकतो. कैफ पुढे असेही म्हणाला की मी धोनीला त्याच्या पदार्पणातील सामन्यापासून पाहात आलो आहे.