testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पाक खेळाडू म्हणाला, विराट सारखे यशस्वी बनायचे आहे

Last Updated: बुधवार, 15 मार्च 2017 (13:35 IST)
पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजम आणि विराट कोहलीत कुठलीही समानता नसली तरी त्याला भारतीय कर्णधार सारखे बनायचे आहे. वेस्टइंडीजच्या विरुद्ध सीमित षटकांच्या शृंखलेसाठी अभ्यास शिविरसाठी निवडून आलेल्या आजमने इस्लामाबादामध्ये पत्रकारांना सांगितले की त्याचे स्वप्न कोहलीसारखे यश मिळवणे आहे.

आजमने म्हटले की मी त्याच्यासारखा खेळत नाही, आमची पद्धत वेगळी आहे. पण विराट कोहली जो आपल्या संघासाठी करतो मलाही त्याच्याच सारखा यशस्वी खेळाडू बनायचे आहे. त्याने सांगितले की मला आपल्या संघाच्या प्रदर्शनासाठी योगदान द्यायचे आहे. मला संघासाठी धावा काढायच्या आहे. मला अद्याप फार दूर जायचे आहे पण मला माहीत आहे माझी दिशा काय आहे.

महत्त्वाचे म्हणजे बाबर आजम मागील काही दिवसांपासून पाकिस्तानसाठी वनडे क्रिकेटमध्ये उत्तम खेळीचे प्रदर्शन करत आहे. बाबरने आतापर्यंत ऐकून 23 वनडे सामने खेळले आहे, ज्यात त्याने 53च्या औसतीप्रमाणे एकूण 1168 धावा काढल्या आहेत. बाबरने आतापर्यंत 4 वनडेमध्ये शतक लावले आहे.


यावर अधिक वाचा :