शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: हैदराबाद , सोमवार, 13 फेब्रुवारी 2017 (11:04 IST)

भारताचा अश्विन सुपरफास्ट

झटपट 250 विकेट घेण्याचा विक्रम
टीम इंडियाचा जादूगर फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने रविवारी  बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात एका आंतराष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. २५0 कसोटी विकेट्स झटपट घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत अश्विन अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. त्याने ४५ व्या कसोटोतच हा मैंलाचा दगड गाठता आहे.

६ नोव्हेंबरला 2011 रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण काणारा अश्विन आज टीम इंडियाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ झाला आहे. ज्या-ज्यावेली संघाला विकेट घेणे गरजेचे होते, तेव्हा-तेव्हा हा हुकमी एक्का मदतीला घाऊन येतो. या लौकिकाला साजेशीच कामगिरी त्याने बांगलादेशविरुद्ध हैदराबाद कसोटीतही केली. शाकीब अल हसन आणि मोहम्मद रहीम यांनी जोडी फोडून त्याने भारताला शनिवारी मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर रविवारी शतकवीर रहीमला रिद्दीमान साहाकरवी झेलबाद करून अश्चिनने बांगलादेशचा गुंडाळला व 250 वी  कसोटी विकेटही मिळवली. इतक्या कमी सामन्यांमध्ये हा टप्पा गाठणे आतापर्यंत कुणालाच जमले नव्हते. 

अश्विनने ४५ कसोटीत ही कामगिरी केली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिलीने ४८ कसोटीत तर भारताच्या अनिल कुंबळेने ५५ कसोटीत ही कामगिरी केली होती. ४५ कसोटीत सुरुवातीस डेल स्टेनच्या नावावर 232 कसोटी बळी होते. तर फिरकी गांलदाज मुथय्या मुरलीधरनने ४५ कसोटीत २१८ बळी घेतले होते. श्रीलंकेच्या रंगना हेरथ ने ४६ कसोटीत २४७ बळी मिळविले होते.