शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

सचिन तेंडुलकर झाला शाहरूखचा 'फिलॉसॉफर'

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटचा गॉड आहे, अनेकांचा गाइड आहे. पण, बॉलिवूडचा किंग खान शाहरूखला त्याने ट्विटरवरून हरण्याचे, पराभवाचे महत्त्व पटवून सांगितले तेव्हा चाहत्यांना फिलॉसॉफर सचिनचे दर्शन घडले.
 
'सचिन... ए बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला. खट्याळ-खोडकर सचिन ते भारतरत्न सचिन हा प्रेरणादायी जीवनपट या डॉक्यु-ड्रामामधून उलगडून दाखवला जाणार आहे. स्वाभाविकच, सचिनच्या चाहत्यांना, क्रिकेटप्रेमींना या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींनी सचिनला शुभेच्छा दिल्यात. पण, बॉलीवूडचा किंग शाहरूख, क्रिकेटच्या किंगला शुभेच्छा देताना थोडासा हळवा झाला.
'जेव्हा तू चांगले खेळायचास, मला मी जिंकल्यासारखे वाटायचे आणि जेव्हा तू अपयशी ठरायचास, तेव्हा मी हरायचो. इतर अब्जावधी चाहत्यांप्रमाणे मी माझ्या मार्गदर्शकाला मिस करतोय', अशा भावना शाहरूखने ट्विटरवरून व्यक्त केल्या.
 
यावर, सचिनने शाहरूखला हरण्याविषयीचे तत्त्वज्ञान सांगितले. जीवनात जर पराभव नसता, तर कुणी कधी जिंकलेच नसते आणि काही शिकूही शकले नसते, असे मत त्याने मांडले. 'जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत आहे', असाच काहीचा उपदेश सचिनने शाहरूखला केला. त्यावर लाइक्सचा पाऊस पडलाय.