शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली /हैदराबाद , सोमवार, 13 फेब्रुवारी 2017 (16:28 IST)

INDvsBAN: बांगलादेशाला 208धावांनी पराभव करून टीम इंडियाची लागोपाठ सहाव्या सिरींजमध्ये विजय

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू असलेले कसोटी सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी रवींद्र जडेजा, इशांत शर्मा समेत इतर गोलंदाजांची घातक गोलंदाजीच्या मदतीने टीम इंडियाने बांगलादेशाच्या विरुद्ध सामन्यात 208 धावांनी विजय मिळवून आपला विजयीक्रम कायम ठेवला आहे. शेवटच्या दिवशीच्या दुसर्‍या सेशनमध्ये  5 विकेट घेऊन टीम इंडियाने सामन्यावर आपला कब्जा जमवून घेतला.  
 
टेस्टच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला जिंकण्यासाठी 7 विकेटची गरज होती ज्याची सुरुवात केली रवींद्र जडेजा ने. आपल्या चवथ्या दिवशी (रविवार)चा स्कोर तीन विकेटच्या नुकसानीवर 103 धावांहून पुढे खेळायला उतररेल्या बांगलादेशाच्या संघाने पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दोन गडी गमावून सोमवारी भोजनकालपर्यंत 99 धावा जोडल्या. अतिथी संघाने दिवसाचा पहिला झटका तिसर्‍या ओवरमध्ये शाकिब अल-हसन (22)च्या रूपात घेतला. शाकिबला 106च्या ऐकून धावांवर रवींद्र जडेजाने चेतेश्वर पुजाराच्या हाती कॅच आऊट करून पवेलियन पाठवले.  
 
शाकिबनंतर क्रीजवर आलेले पहिल्या डावाचे शतकवीर कप्तान मुश्फिकुर रहीम (23) ने महमुदुल्लासोबत बांगलादेशाला संकटातून  काढण्याचा प्रयत्न केला आणि पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली, पण रविचंद्रन आश्विनाने मुश्फिकुरच्या डावाचा शेवट करून अतिथी संघाच्या अपेक्षांवर पाणी फेरले. मुश्फिकुर 162च्या एकूण स्कोरवर पवेलियन परतला.  
 
यानंतर पहिल्या डावात बांगलादेशाने एकही विकेट गमावले नाही. महमुदुल्ला आणि सब्बीरने सांभाळून खेळत सहाव्या विकेटसाठी  40 धावा जोडल्या त्यानंतर मुश्फिकुर रहीम आणि शब्बीर रहमानने काही संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. अतिथी संघ लंचपर्यंत  भारतापेक्षा 257 धावा पाठीमागे होता. महमुदुल्ला 58 आणि सब्बीर रहमान 18 धावांवर नाबाद होते पण लंचहून परतल्यानंतर इशांत शर्माची तुफानी गोलंदाजी (3 विकेट)च्या मदतीने टीम इंडियाने बाकी उरलेले फलंदाजांना फक्त 50 धावांच्या आत आऊट करून टीम इंडियाला विजयाच्या मार्गावर उभे करून ठेवले.   
 
या आधी, भारताने रविवारी आपला दुसरा डाव चार विकेट गमावून 159 धावांवर घोषित करून बांगलादेशाला 458 धावांचे लक्ष्य दिले होते. ज्याच्या उत्तरात त्याने चवथ्या दिवशी आपले 3 विकेट गमावून दिले होते.  
 
भारतीय संघाने आपला पहिला डाव सहा विकेटच्या नुकसानीवर 687 धावांवर घोषित केला होता आणि बांगलादेशाचा पहिला डाव  388 धावांवर संपुष्टात आला होता. भारतासाठी पहिल्या डावात कर्णधार कप्तान विराट कोहलीने रेकॉर्ड दुहेरी शतक, जेव्हा की मुरली विजय आणि विकेटकीपर रिद्धिमन साहाने शानदार शतकीय डाव खेळला.