testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मल्ल्याची क्रिकेट प्रेक्षकांकडून हेटाळणी!

vijay mallya
इंग्लंडमध्ये पळून गेलेला व्यावसायिक विजय मल्ल्याची लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर भारतीय वंशाच्या प्रेक्षकांनी हुर्यो उडवली. टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या सामन्यांना आणि कार्यक्रमांना बिनदिक्कत हजेरी लावणारा मल्ल्या लंडनमध्ये ऐश्योआरामात जगत असल्याचं चित्र मसोर आलं होतं.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या सामन्यासाठी मल्ल्या केनिंग्टन ओव्हलवर आला असताना भारतीय वंशाच्या प्रेक्षकांनी त्याच्या नावानं बोंब ठोकली. भारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लावून पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या परदेशात तिसर्‍यांदा टीम इंडियाचा सामना पाहायला आला होता. मल्लया ज्यावेळी ओव्हलवर सामना पाहण्यासाठी आला, त्यावेळी मैदानाबाहेर असलेल्या भारतीय वंशाच्या क्रिकेट रसिकांनी जोरजोरात चोर....चोर...चोर.. ओरडण्यास सुरूवात केली. केवळ घोषणा देऊन प्रेक्षक थांबले नाहीत, तर सामन्यादरम्यानही प्रेक्षकांनी मल्ल्याला भगोडा...भगोडा.. असे म्हणत हेटाळणी केली.
याआधी चॅम्पियन्स ट्रॉफीमधीलच पाकिस्तान आणि श्रीलंकेविरोधातील टीम इंडियाचे सामने पाहण्यासाठी विजय मल्ल्या हजर होता. विजय मल्ल्या याने भारतीय बँकांना 9 हजार कोटी रूपयांचा चुना लावला आहे आणि गेल्या 15 महिन्यांपासून भारतातून फरार आहे.


यावर अधिक वाचा :