गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई : , गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (11:39 IST)

पारंपरिक लूकमध्ये विराट-अनुष्काचे फोटो व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोत दोघेही पारंपरिक लूकमध्ये दिसत आहेत. हा फोटो एका अॅड शूटचा असल्याचे म्हटले जात आहे.
 
या फोटोत विराट काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे, तर अनुष्का गुलाबी रंगाच्या लहंग्यात सजलेली दिसत आहे. विराट अनुष्काकडे एकटक पाहत असून अनुष्काच्या चेहऱ्यावर हास्य आहे. हा फोटो अनुष्का-विराटच्या #virushka नावाच्या फॅनक्लबच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
 
मुंबईत मंगळवारी या जाहिरातीचे चित्रीकरण झाले. परंतु दोघांनी कोणत्या जाहिरातीसाठी एकत्र काम केले, हे अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, अनुष्का आणि विराट जाहिरातीत एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ते हेड अँड शोल्डर्स या शॅम्पूच्या जाहिरातीत झळकले होते.