Widgets Magazine

महिला क्रिकेट टीम, प्रत्येक खेळाडूला 50 लाखांचे बक्षीस

Last Modified शनिवार, 22 जुलै 2017 (17:16 IST)

भारतीय महिला क्रिकेट टीममधील प्रत्येक खेळाडूंला बीसीसीआय प्रत्येकी 50 लाखांचं बक्षीस देणार आहे.तर सपोर्टिंग स्टाफला 25 लाखांचं बक्षीस बीसीसीआयने जाहीर केलं आहे. बीसीसीआयकडून शनिवारी या संदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. आयसीसी महिला विश्वचषकातील कामगिरीबद्दल बीसीसीआयने महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर केलं आहे.

आयसीसी महिला विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी भारत-इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. भारताने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव केला होता.
विश्वचषकाची अंतिम फेरी गाठल्याबद्दल बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिंनदन केले. बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी हरमनप्रीतच्या खेळीचे कौतुक करीत कर्णधार मिताली आणि संघाला फायनल जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.यावर अधिक वाचा :