गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 17 एप्रिल 2014 (17:29 IST)

'आयपीएल'च्या -7व्या सत्रावर 'सत्ता' कोणाची?

मुंबई इंडियंस :

गेल्या सत्रातील कामगिरी : विजेते कर्णधार रोहित शर्मा

प्रमुख खेळाडू : मायकेल हस्सी, आदित्य तारे, रोहित शर्मा, सी.एम. गौतम/जलाज सक्सेना, केरॉन पोलार्ड, कोरी अँडरसन, हरभजनसिंग, लेसिथ मलिंगा, प्रग्यान ओझा.

अजिंक्यपद टिकवण्याचे आव्हान असलेल्या मुंबई इंडियंसने सातव्या सत्रात दिनेश कार्तीक आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल जॉंन्सन वगळता इतर प्रमुख खेळाडूंना कायम राखले आहे. हस्सीच्या रुपाने तडाखेबंद सलामीवीर मिळाला असून त्याला पोलार्ड व अँडरसनची साथ मिळेल. भज्जी, ओझा आणि यॉर्कर स्टार मलिंगावर गोलंदाजीची मदार. 
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर : 

गेल्या सत्रातील कामगिरी : गुणतालीकेत पाचव्या स्थानी

कर्णाधार : विराट कोहली

प्रमुख खेळाडू : ख्रिस गेल, विराट कोहली, पार्थिव पटेल, युवराजसिंग, ए.बी. डिविलियर्स, विजय झोल, एल्बी मोर्केल, मिशेल स्टार्क, शहादाब जकाती, वरुण एरॉन, अशोक डिंडा.

भारतीय क्रिकेटमधील सध्याचा सर्वांत चर्चित विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अजिंक्यपद पटकविण्याचे चॅलेंजर्समोर असेल. 14 कोटींचा युवराज कशी कामगिरी करता हे सगळ्यात मोठी उत्सुकता आहे. युवीची कारकीर्द जणू पणालाच लागली आहे. 
कोलकाता नाईट रायडर्स :

गेल्या सत्रातील कामगिरी : सातव्या स्थानावार

कर्णधार : गौतम गंभीर

प्रमुख खेळाडू : रॉबिन उथप्पा, गौतम गंभीर, जॅक कॅलिस, मनीष पांडे, युसूफ पठाण, ख्रिस लेयान, शाकीब अल हसन, पियुष चावला, सुनील नारायणी, विनयकुमार, मोर्नी मोर्केल, उमेश यादव.

2012 साली अजिंक्यपद पटकविणार्‍या या संघाची गेल्या सत्रात वाताहत झाली. तरीही सातव्या सत्रासाठी शाहरुखने आपल्या जुन्याच भिडूंवर विश्वास ठेवला आणि त्याचमुळे गंभीर, कॅलिस, पठाण, नारायणी यांच्यावर दबाव वाढला आहे. कॅलिस आता निवृत्त झाला असून टी-20त हे जुने नाणे कसे खणखणते याची उत्सुकता आहे.
सनरायझर्स हैदराबाद :

गेल्या सत्रातील कामगिरी : चौथ्या स्थानी

कर्णधार : शिखर धवन

प्रमुख खेळाडू : डेल स्टेन, इशांत शर्मा, डेरेन सॅमी, अमित मिश्रा, डेव्हिड वॉर्नर, इरफान पठाण, वेणुगोपाल राव, भुवनेश्वर कुमार.
टीम इंडियाचा प्रमुख सलामीवीर झालेल्या शिखर धवनकडे मॅन विनिंग खेळाडूंची फौज आहे. त्याचा उपयोग कसा करतो यावरच सनरायझर्सचे यश अवलंबून आहे. बलाढ्य गोलंदाजी असलेल्या सनरायझर्सची फलंदाजी गेल्या सत्रात कमकुवत होती. यंदा वॉर्नर, सॅमी आणि स्वतः धवन यांना फटकेबाजी करावी लागेल. 
किंग्ज इलेव्हन पंजाब :

गेल्या सत्रातील कामगिरी : सहावे स्थान

कर्णाधार : जॉर्ज बेली

प्रमुख खेळाडू : डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल जॉंन्सन, जॉर्ज बेली, शॉन मार्श, विरेंद्र सेहवाग, चेतेश्वेर पुजारा, मुरली कार्तिक, थिशारा परेरा, लक्ष्मीपती बालाजी.

किंग्स इलेव्हन पंजाबला दुसरा ऑस्ट्रेलियन संघ म्हटल्यास वावगे ठरु नये. कर्णधारपासून बहुतेक प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत. यातून विरेंद्र सेहवाग आणि चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीकडे खास लक्ष असेल. गचाळ फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर असलेल्या सेहवागला पुन्हा फॉर्मात येण्याची संधी आहे. 
राजस्थान रॉयल्स :

गेल्या सत्रातील कामगिरी : तिसर्‍या स्थानी

कर्णधार : शेन वॅटसन

प्रमुख खेळाडू : ब्रॅड हॉज, शेन वॅटसन, अभिषेक नायर, स्टीव्हन स्मिथ, संजू सॅमसन, धवल कुलकर्णी, उन्मुक्त चंद, स्टुअर्ट बिन्नी, केवीन कुपर.

गेल्या सत्रात याच संघातील तिघांनी स्पॉट फिक्सिंग केले आणि त्यामुळे आयपीएलची प्रतिमा खराब झाली. या धक्क्यातून सावरत द्रविडच्या नेतृत्वाखाली राजस्थानने उपांत्य फेरीत धडक मारली. यंदा द्रविड नाही; पण स्पॉट फिक्सिंगचा डाग घेऊन वॅटसनच्या नेतृत्वखाली हा संघ मैदानात उतरेल. टीम इंडियातील तरुण तुर्क खेळाडूंना चांगली कामगिरी करण्याचे आव्हान वॅटसनसमोर आहे.
चेन्नई सुपर किंग्ज :

गेल्या सत्रातील कामगिरी : उपविजेते

कर्णधार : महेंद्रसिंग धोनी

प्रमुख खेळाडू : डेव्हन स्मिथ, ब्रॅडॉन मॅककुलम, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, बाबा अपराजित, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, बेन हाल्फिनहॉस, सॅम्युअल बद्री, इश्वर पांडे, मोहित शर्मा.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची गडद छाया घेऊन चेन्नईचे सुपर किंग्ज मैदानात उतरणार आहेत. आयपीएल तिसर्‍यांदा जिंकणारा एकमेव संघ ठरण्याचे आव्हान त्यांचासमोर असेल. 2009 पासून त्यांच्या संघात असलेले माइक हस्सी, मुरली विजय, एल्बी मोर्केल यंदा संघात नाहीत. मात्र प्लेसिस, रैना, मॅककुलम स्मिथ, धोनीमुळे टीम पुन्हा संतुलित आहे.  
दिल्ली डेअरडेव्हिल्स :

गेल्या सत्रातील कामगिरी : शेवटच्या स्थानावर

कर्णधार : केविन पीटसन

प्रमुख खेळाडू : मुरली विजय, केविन पिटरसन, रॉसटेलर, जे.पी. ड्युमिनी, दिनेश कार्तिक, सौरव तिवारी, मनोज तिवारी, जिमी निस्हॅम नॅथन काऊल्टर नेल, वायने पर्नेल, मोहम्मद शामी, राहुल शर्मा.

कागदावर बलाढ्य असणारा संघ प्रत्यक्ष मैदानावर कसा ढेपाळतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली डेअरडेव्हिल्स. आपला आयकॉन खेळाडू विरेंद्र सेहवागलाही बाहेर ठेवत यंदा दिल्लीने नवे रुप घेतले आहे. पीटरसनचे नेतृत्व दिल्लीचे नशीब पलटणार का?