शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2016 (13:12 IST)

आयपीएल लिलाव: वॉटसन सर्वात महाग खेळाडू, युवराजला 7 कोटी

बंगळूर- ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉट्सन आयपीएल लिलावच्या पहिल्या फेरीत सर्वात महागात विकले गेले. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने वॉट्सनला तब्बल 9.5 कोटी रुपये देऊन विकत घेतले आहे. तर, भारतातील स्टार युवराजसिंगला सनरायजर्स हैदराबादने 7 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले.
 
आयपीएलचे हे सीझन 9 एप्रिल ते 23 मे दरम्यान पार पडणार आहे. न्यायालयाच्या दणक्‍याने चेन्नई आणि राजस्थान फ्रॅंचाईजी दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्या असून, त्यांची जागी पुणे आणि राजकोट या दोन नव्या फ्रॅंचाईजी दोन वर्षांसाठी घेण्यात आल्या आहेत.
 
लिलाव झालेले खेळाडू -
 
शेन वॉट्सन - 9.5 कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
युवराजसिंग - 7 कोटी (सनरायजर्स हैदराबाद)
ख्रिस मॉरिस - 7 कोटी (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
मोहित शर्मा - 6.5 कोटी (किंग्ज इलेव्हन पंजाब)
आशिष नेहरा - 5.5 कोटी (सनरायजर्स हैदराबाद)
मिशेल मार्श - 4.8 कोटी (पुणे सुपरजायंट्स)
संजू सॅमसन - 4.2 कोटी (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
चार्ल्स ब्रेथवेट - 4.2 कोटी (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
ईशांत शर्मा - 3.8 कोटी (पुणे सुपरजायंट्स)
जॉस बटलर - 3.8 कोटी (मुंबई इंडियन्स)
प्रवीण कुमार - 3.5 कोटी (गुजरात लायन्स)
केव्हिन पीटरसन - 3.5 कोटी (पुणे सुपरजायंट्स)
टीम साऊथी - 2.5 कोटी (मुंबई इंडियन्स)
ड्वेन स्मिथ - 2.3 कोटी (गुजरात लायन्स)
डेल स्टेन - 2.3 कोटी (गुजरात लायन्स)
दिनेश कार्तिक - 2.3 कोटी (गुजरात लायन्स)
धवल कुलकर्णी - 2 कोटी (गुजरात लायन्स)
स्टुअर्ट बिन्नी - 2 कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
जयदेव उनाडकट - 1.6 कोटी (कोलकता नाईट रायडर्स)
काईल ऍबॉट - 1.6 कोटी (किंग्ज इलेव्हन पंजाब)
जॉन हेस्टिंग्ज - 1.3 कोटी (कोलकता नाईट रायडर्स)
बरिंदर स्रान - 1.2 कोटी (सन रायजर्स हैदराबाद)
इरफान पठाण - 1 कोटी (पुणे सुपरजायंट्स)
मार्कस स्टोनिस - 55 लाख (किंग्ज इलेव्हन पंजाब)
ट्रॅव्हिस हेड - 50 लाख (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
मुशफिकूर रेहमान - 50 लाख (सन रायजर्स हैदराबाद)
कॉलिन मुन्रो - 30 लाख (कोलकता नाईट रायडर्स)
अभिमन्यू मिथुन - 30 लाख (सन रायजर्स हैदराबाद)