शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बर्मिंगहॅम , मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (15:00 IST)

एक दिवसीय मालिकेतील विजयासाठी भारत उत्सुक

इंग्लंडविरुध्दच्या 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतल्याने आज मंगळवारी होणार्‍या  चौथा सामना जिंकून मालिकेत विजय मिळविण्यासाठी भारत उत्सुक आहे. भारत आणि इंग्लंडचा चौथा एकदिवसी सामना आज येथील मैदानावर होत आहे.
 
पाहुण्या भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. कार्डीप आणि नॉटिंगहॅम येथील एकदिवसीय सामने भारताने जिंकले आहेत. ब्रिस्टॉल येथील पहिला सामना पावसामुळे वाहून गेला होता. दुसर्‍या व तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाला प्रतिकार करणे शक्य झालेले नसल्याने भारतीय संघ सध्या जोशात आहे. कसोटी सामन्यांमध्ये भारताचा पराभव केल्यानंतर इंग्लंडला एकदिवसीय सामन्यात मात्र यश मिळविता आलेले नाही. 2015 च्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील विश्वचषक एकदिवसीय स्पर्धेसाठी इंग्लंडदेखील चांगला संघ तयार करण्यासाठी झुंजत आहे. अँलेस्टर कुक याने आघाडी फळीत खेळू नये म्हणून बरीच टीका झाली होती. मात्र, कुक याने अँलेक्स हालेस याच्या साथीत 2 सामन्यांमध्ये अर्धशतकीय भागिदारी करीत टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. कुकच्या एकदिवसीय सामन्यातील  कर्णधार म्हणून झालेल्या कामगिरीबाबत आता सर्वच वृत्तपत्रातून टीका होत आहे. कुकचा पाठीराखा ग्रीन स्वॉन याने विश्वचषक स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून नवीन खेळाडू शोधावा लागेल, असे मत व्यक्त केले आहे.
 
अकरा खेळाडूंमध्ये 2 फिरकी गोलंदाज खेळविण्यास कुक त्यार होत नाही. त्यामुळे इंग्लंडला तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. कुक नेहमी पारंपरिक पध्दतीने विचार करतो आणि धाडसी निर्णय घेत नसल्याने एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला पराभवाला सामोरे जाणे भाग पडत आहे, अशी टीका वॉशिंग्टन पोस्ट च्या दैनिकाने केली आहे.