शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 17 डिसेंबर 2015 (11:15 IST)

ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय संघाची निवड शनिवारी

मुंबई- ऑस्ट्रेलियात जानेवारी 2016 मध्ये होणार्‍या वनडे आणि टी-20 सामन्यांचा मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड शनिवारी, 19 डिसेंबर रोजी दिल्ली येथे केली जाणार आहे.
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या दौर्‍यावर जाणार्‍या संघाची निवड करण्यासाठी संदीप पाटीलच्या नेतृत्वाखालील निवड समितीची बैठक 19 डिसेंबरला दिल्ली येथे करण्यात आली आहे. 12 ते 31 जानेवारी या कालावधीतील दौर्‍यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पाच वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. वनडे सामने पर्थ, ब्रिस्बेन, मेलबर्न कॅनबरा आणि ‍सिडनी येथे खेळले जाणार असून टी-20 सामने एडिलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे रंगणार आहे.