गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: बर्मिंघम , शुक्रवार, 31 जुलै 2009 (21:51 IST)

ऑस्ट्रेलियास 263 धावांमध्ये गुंडाळले

ऍशेस मालिकेतील तिसर्‍या कसोटीत इंग्लंडच्या जेम्स अँडरसन आणि जी ओनियन्स यांच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा संघ 263 धावांमध्ये गारद झाला. अँडरसन पाच तर ओनियन्स चार फलंदाजांना बाद केले.

शेन वॅटसन आणि सायमन कॅटीच यांनी ऑस्ट्रेलियाची सुरवात चांगली करुन दिली. दोघांनी पहिल्या गडीसाठी 85 धावांची भागेदारी केली. कॅटीच 46 धावांवर बाद झाला. त्यानंतर वॅटसनने अर्धशतक पूर्ण केले. तो 62 धावांवर ओनियन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. ही सलामी जोडी गेल्यावर कर्णधार रिकी पॉटींग (38) वगळता इतर कोणीही इंग्लंडचा गोलंदाजांचा सामना करु शकले नाही. त्यांच्या संपूर्ण संघ 263 धावांवर बाद झाला.

धावफलकासाठी येथे क्लिक करा