शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 28 जुलै 2009 (16:20 IST)

कुंबळेच्या पत्नीस न्यायालयाचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याची पत्नी आणि तिचा पूर्व पती यांच्यामध्ये मुलीच्या पालन पोषणासंदर्भात सुरु असलेला वाद न्यायालयाबाहेर सोडवावा, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने कुंबळेच्या पत्नीस दिला आहे.

अनिल कुंबळेची पत्नी चेतना आणि तिचे पूर्व पती जाहगिरधर यांची 15 वर्षीय मुलीच्या पालन पोषणासंदर्भातील प्रश्न न्यायालयाबाहेर सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी तीन आठवड्यपर्यंत स्थगित केली आहे.

जाहगिरधार याच्याशी चेतनाने सन 2004 मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर अनिल आणि चेतना कुंबळेकडे राहणार्‍या आपल्या मुलीस आपल्याकडे ठेवण्याची मागणी जाहागिरधारने कर्नाटक उच्च न्यायालयात केली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने जाहागिरधरकडून निर्णय दिला होता. यामुळे चेतना कुंबळे सर्वोच्च न्यायालयात गेली होती.