शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: चेन्नई , सोमवार, 27 एप्रिल 2015 (15:43 IST)

चेन्नईला नेहराच्या अनुभवाचा फायदा - धोनी

चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबवर मिळवलेला ९७ धावांचा विजय हा आपल्या संघाचा सर्वात सोपा आणि सहज विजय होता, असे मत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले आहे. वेगवान गोलंदाज आशीष नेहराच्या अनुभवाचा आपल्या संघाला फायदा होत आहे, असेही या वेळी धोनीने सांगितले. 
 
धोनीने सामन्यानंतर सांगितले की, आयपीएलमधील आतापर्यंतचा आमचा हा सर्वात सोपा विजय आहे. फिरकीपटूंना खेळपट्टीकडून मदत मिळत होती, तसेच त्यांनी या संधीचा चांगला फायदा उठवला. चेन्नई सुपरकिंग्जने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ब्रँडन मॅक्कुलमने जीवदानानंतर केलेली ६६ धावांची खेळी आणि धोनीच्या नाबाद ४१ धावांच्या मदतीने ३ बाद १९२ धावा केल्या. यानंतर किंग्ज इलेव्हनला ९ बाद ९५ धावांवर रोखले.