शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वार्ता|
Last Modified: नागपुर , शनिवार, 20 नोव्हेंबर 2010 (12:24 IST)

जामठा स्टेडियमध्ये सचिनचे शतक लागणार का?

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील आज, शनिवारपासून खेळल्या जाणाऱ्या निर्णायक कसोटी सामन्यात कोण सरशी साधणार, यापेक्षा या लढतीत सचिन तेंडुलकर सुवर्ण महोत्सवी कसोटी शतक झळकावणार का? याचीच चाहत्यांना अधिक उत्सुकता आहे.

सचिन तेंडुलकरसाठी विदर्भ क्रिकेट संघटनेचे जामठा स्टेडियम ‘हॅप्पी हंन्टिंग’ ठरले आहे. याआधी, जामठा मैदानावर खेळल्या गेलेल्या दोन्ही कसोटी सामन्यात शतके ठोकणारा सचिन यावेळी येथे शतकांची हॅट्ट्रिक साजरी करण्यास उत्सुक आहे. विशेष म्हणजे, २००८ मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनने कसोटी कारकिर्दीतील ४० शतकांचा टप्पा गाठला होता. व्हीसीएच्या या नव्या मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटीत सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (१०९) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (१००) शतके झळकावली आहेत.