शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: दुबई , शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 (11:13 IST)

त्रिशतक झळकवतात हे सचिनला माहीत नव्हते: कपिल देव

द्विशतक किंवा त्रिशतक कसे झळकावले जाते हे सचिन तेंडुलकरला माहीत नव्हते, असे परखड मत माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले.
 
दुबईमध्ये शेन वॉर्न, वसीम अक्रम आणि इयान बोथम या माजी दिग्गज क्रिकेटपटूंसह कपिल देव एका कार्यक्रमात हजर होते. या वेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. माझ्या म्हणण्याचा वेगळा अर्थ काढू नका; मात्र सचिनने स्वत:च्या क्षमतेला योग्य न्याय दिला नाही, असे कपिल देव यांनी सांगितले.
 
सचिन जबरदस्त खेळाडू होता; मात्र त्याला केवळ शतकच झळकवता येत होते. द्विशतक, त्रिशतक किंवा ४०० धावा कसे झळकवतात, हे सचिनला माहीत नव्हते, असे कपिल देव यांनी सांगितले.