गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

दिल्लीत ऑस्ट्रेलियास गवसला आशेचा किरण

FILE
भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत ३-० ने सपाटून मार खाल्ल्यानंतर कोटलाच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियास आशेचा किरण दिसला असून 'अब दिल्ली दूर नही'चा कित्ता गिरवत मैदान मारायचेच या इराद्याने कांगारूंनी सामन्यावर पकड मजबूत करण्यास सुरूवात केली आहे.

कांगारूंनी निम्म्याहून अधिक भारतीय संघ गारद केला आहे. नाथन लियोनच्या फिरकीने भारतीय फलंदाजीवर पास आवळला असून हा सामना वाचवण्यासाठी भारतास निकराने झुंज द्यावी लागेल.

कांगारूंनी पहिल्या डावांत २६२ धांवा केल्या असून या खेळपट्टीवर ही धावसंख्या चारशेच्या बरोबरीची ठरू शकते. काल पहिल्याच दिवशी संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ चहापानाअगोदर दिडशेच्या आत गारद होणार असल्याचे वाटत असतानाच पीटर सीडल व जेम्स पॅटीन्सन यांनी आठव्या विकेटसाठी दमदार भागिदारी रचून दिवसअखेर आठ गड्यांवर २३१ पर्यंत मजल मारली आणि सकाळी २६२ पर्यंत पल्ला गाठलहोता.

कोटलाची खेळपट्टी ठोस नसल्याने येथे फलंदाजी करणे कठिण होणार आहे. खासकरून ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा येथे भारतासाठी घातक ठरू शकते.

टेस्ट ड्रॉ झाल्यास भारतास काही फरक पडणार नसल्याचे कांगारूंना कोणत्याही परिस्थितीत संधी न देण्याचे भारतीय डावपेच असतील.