गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By wd|
Last Modified: लंडन , मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (14:38 IST)

धोनीचे कर्णधारपद सोडण्याचे संकेत

नुकत्याच संपलेल्या इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या क्रिकेट मालिकेत 1-3 ने सपाटून मार खालल्यानंतर भारताच्या  संघावर व कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर जोरदार टीका होत आहे.
 
पाचवी कसोटी हरल्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जरा थांबा, पाहा पुढे काय होते ते अशा प्रकारचे संभ्रमव्यस्थेत टाकणारे उत्तर धोनीने दिले त्यामुळे धोनी कर्णधारपद सोडण्याचे संकेत तर देत नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.
 
इंग्लंडविरुध्दच्या मालिकेत भारताच्या संघाने आत्मविश्वास गमावल्याचे आणि अनुभवाची कमतरता असल्याचे त्याने मान्य केले.
 
भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी टीम इंडियाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांना प्रशिक्षकपदावरुन दूर करण्याची मागणी केली आहे. तर धोनीच्या  कर्णधारपदाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. इंग्लंडने रविवारी ओव्हलवर भारताचा पाचव्या व अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात 1 डाव 244 धावांनी पराभव केला त्यानंतर माजी खेळाडूंनी टीकेची झोड उठवली आहे.
 
फ्लेचर यांचे योगदान हे शून्य आहे. लॉर्डसच्या कठीण खेळपट्टीवर भारताने ऐतिहासिक विजय मिळविला व भारताने मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर उर्वरित तीन कसोटीत फ्लेचर यांनी काय केले असा प्रश्न माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी विचारला आहे. चाळीस वर्षात भारताचे मोठे कसोटी पराभव झाले व कसोटी सामने तीन दिवसात संपले. कर्णधार धोनीने त्यांचे तंत्र बदलले फलंदाजी चांगली केली परंतु नेतृत्व करताना त्याने त्याचे डावपेच का बदलले नाहीत, असेही वाडेकर म्हणाले.
 
धोनी हा वारंवार आश्चर्य अथवा चमत्कार घडण्याची अपेक्षा संघ अडचणीत असताना करीत असतो त्याच यष्टीरक्षण आणि नेतृत्वाबाबत मी  समाधान नाही. धोनी हा त्याच्या मनाप्रमाणे करतो व त्याची पुनरावृत्ती करतो असे माजी श्रेष्ठ फलंदाज गुंडप्पा विश्वनाथ यांनी सांगितले.
 
फ्लेचर यांचे योगदान काहीही नाही असे माजी फिरकी गोलंदाज इरापल्ली प्रसन्ना म्हणाले तर माजी कर्णधार के. श्रीकांत यांनी प्रशिक्षकाला या अपयशाबद्दल धारेवर धरले. माजी फलंदाज चंदू बोर्डे यांनी या पराभवाचा दोष प्रशिक्षक फ्लेचरवर ठेवला. संघाच्या फलंदाजाच्या खेळण्याच्या तंत्रावर त्यांनी टीका केली. 
 
कर्णधार अलेस्टर कुकने लॉर्डस्वरील पराभवानंतर आपले तंत्र बदलले परंतु भारताच्या तरुण फलंदाजांनी आपले तंत्र बदलले नाही. क्रीझमध्ये उभारताना काही फूट ऑफला उभे राहणे गरजेचे होते असेही बोर्डे म्हणाले. माजी खेळाडू अंशुमन गाकवाड यांनीही फ्लेचरवर टीका केली आहे. धोनीच्या कर्णधारपदाची मुदत संपुष्टात आली आहे असे अशोक मल्होत्रा म्हणाला.