शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 22 ऑगस्ट 2014 (12:55 IST)

परदेशात गर्लफ्रेंड नेण्यावर भारतीय क्रिकेट मंडळाची बंदी

भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौर्‍याच्या वेळी खेळाडूंना मैत्रिणीला सोबत नेण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बंदी घातली आहे, परंतु या वृत्ताचा मंडळाने इन्कार केला आहे.
 
इंग्लंड दौर्‍यात इंग्लंडने टीम इंडियाच्या पाच कसोटी सामन्यांच्या क्रिकेट मालिकेत 3-1 असा मानहानीकारकरीत पराभव केला, त्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. दौर्‍यादरम्यान एखाद्या खेळाडूची पत्नी काही दिवसच त्याच्यासोबत राहू शकणार आहे.
 
भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. कोहलीची कामगिरीही खराब ठरली. त्यामुळे क्रिकेट मंडळाने हा कठोर निर्णय घेतला आहे.
 
इंग्लंड दौर्‍यात खेळाडूंना पत्नी, मैत्रीण व परिवाराला सोबत नेण्यास परवानगी देण्यात आली होती. चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, आर. अश्विन, स्टुअर्ट बिन्नी व गौतम गंभीर यांच्या पत्नी त्यांच्या समवेत होत्या. विराट कोहलीची मैत्रीण अनुष्का शर्मा त्याच्यासोबत होती. इंग्लंड दौर्‍यामुळे मंडळाचे डोळे उघडू लागले आहेत. इंग्लंडमध्ये एखादा खेळाडू सराव करू इच्छित असेल तर त्याची पत्नी अथवा मैत्रीण सराव करू देत नव्हती. खेळाडूंसमवेत फिरण्यावर भर देण्यात त्या गुंग होत्या, त्यामुळे खेळाडूंचे मन विचलित होते व त्याचा परिणाम  खेळावर झाला.
 
लाजिरवाण पराभवानंतर क्रिकेट मंडळाने डोळे वटारले आहेत. टीम इंडियाच्या वाघांची शेळी होण्यामागे त्यांच्या पत्नी अथवा मैत्रीण कारणीभूत होत असा साक्षात्कार क्रिकेट मंडळाला झाला. क्रिकेटपंढरीत लॉर्डस्वर इंग्लंडला नमवून इतिहास रचणार्‍या टीम इंडिाची पुढच्या   तीन कसोटीत पुरती दैना झाली. त्यामुळे क्रिकेट मंडळावर हे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.