बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By wd|
Last Modified: शारजा , शुक्रवार, 18 एप्रिल 2014 (12:21 IST)

बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स विजयी

आयपीएल 2014 मध्ये गुरुवारी शारजा येथे झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 8 गडी आणि 20 चेंडू राखून दणदणीत पराभव केला.

दिल्लीने 4 गडी गमावून 145 धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना रॉयल चॅलेंजर्स संघाने हे आव्हान 2 गड्यांच्या मोबदलत 20 चेंडू राखून पूर्ण केले. बंगळुरू संघाच्या युवराजसिंगने 29 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. तर विराट कोहलीने 38 चेंडूत नाबाद 49 धावा केल. पार्थिव पटेल 28 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. निक मेंडसन याने 6 चेंडूत 4 धावा केल्या.

विराट कोहलीने 49 धावा करताना 2 चौकार आणि 3 षटकार ठोकले. युवराजने 52 धावा करताना 3 चौकार आणि 5 षटकार ठोकले.

जे.पी. डुमिनी आणि रॉस टेलर यांनी पाचव्या जोडीस नाबाद शतकीय भागीदारी केल्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजयासाठी 146 धावांचे आव्हान देऊ शकला.

बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. दिल्लीचा निमित कर्णधार केविन पीटरसन हा त्याची दुखापत बरी न झाल्याने  खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकने दिल्लीचे नेतृत्त्व केले. बंगळुरूचा ख्रिस गेल हा सुध्दा पाठदुखीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही.

दिल्लीची सुरुवात खराब ठरली. मिशेल स्टार्कने मयांक आगरवाल (6) याला झटपट टिपले. अल्बी मोरकेलने दिनेश कार्तिकला शून्यावर टिपले. वरुण अेरॉनने मनोज तिवारीस 1 धावावर टिपले दिल्लीची स्थिती 4.1 षटकात 3 बाद 17 अशी झाली. त्यानंतर लेगस्पिनर चहालने मुरली विजयचा (18) त्रिफळा घेतला.
डुमिनी (48 चेंडू 4 चौकार, 3 षटकार, नाबाद 67 धावा) आणि रॉस टेलर (39 चेंडू 4 चौकार, नाबाद 43 धावा) यांनी दिल्ली संघाला सावरले. बंगळुरूकडून अेरॉनने 9 धावात 1, चहालने 18 धावात 1, अल्बी मोरकेलने 18 धावात 1, मिशेल स्टार्कने 33 धावात 1 गडी टिपला.