गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

भारत ठरला विजेता

विशाखापट्टणम- श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तिसर्‍या टी-20मध्ये भारताने 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भारताने मालिकाही जिंकली आहे.
 
83 धावांचे माफक आव्हान पार करायला भारतीय संघाला 13.5 षटके लागली. हे आव्हान पार करताना भारताने रोहित शर्माच्या रुपात एक गडी गमावला. तर शिखर धवनने नाबाद 46 आणि अजिंक्य रहाणेंने नाबाद 22 धावा काढल.
 
नाणेफेक कर्णधार धोनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धोनीचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवला. आर.अश्विनने पहिल्याच षटकामध्ये श्रीलंकेला दोन धक्के दिले. त्यानंतर मात्र श्रीलंकेचा डाव सावरला नाही. त्यांचा संघ 18 षटकांमध्ये 82 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून अश्विनने सगळ्यात जास्त 4 बळी घेतल्या, तर सुरेश रैनाला 2 आणि नेहरा, बुमरा, जडेजाला प्रत्येकी एक बळी मिळाली. आर.अश्विनला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं.