शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

भारताची विजयी सलामी

विंडीजवर 105 धावांनी मात!

WD
येथील प्रसिद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर काल महिला क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला असून, उद्धाटनीय सामन्यात भारताने तिरुष कामिनीचे शानदार शतक व राऊत ने ठोकलेल्या अर्तशतकीय खेळी व निरांजना नागराजनच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजला 105 धावांनी नमवित स्पर्धेला विजयी सलामी दिली आहे.

भारताने विजयासाठी दिलेले 285 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला विंडीजचा महिला संघ भारताच्या महिला गोलंदाजांच्या अचूक मार्‍यासमोर 44.3 षटकांत 179 धावांतच गरद झाला. विंडीजच्या डावाची सुरुवातच खराब झाली व त्यांचे सलामीवीर 15 धावांतच तंबूत परतले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांसमोर विंडीजच्या फलंदाजांना तग धरता आला नाही व संघाचे शतक फलकावर लागण्यापूर्वीच पाच गडी बाद झाले. त्यांनतर डॉटिनने अवघ्या 16 चेंडूतच चार षटकार व तीन चौकारांसह आक्रामक खेळी करीत सर्वाधिक 39 धावा काढल्या, मात्र निरांजनाने पायचीत करीत डॉटिनचा अडथळा दूर केला. त्यानंतर मात्र डिले (28) वगळता एकही खेळाडू मोठी खेळी करू शकली नाही व विंडीजचा डाव 179 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून निरांजना नागराजनने तीन, तर गौहर सुल्ताना आणि झुलन गोस्वामीने प्रत्येकी दोन बळी टिपले. रीमा मल्होत्रा व शर्माने प्रत्येकी एक गडी बाद करीत विजयात मोलाचा हातभार लावला.